Homeईपेपरमहिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

महिला साठी ज्योतिष व आजचे राशिभविष्य

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार

मंगळवार, 16 सप्टेंबर 2025. भाद्रपद कृष्ण दशमी.

राहू काळ – दुपारी 3 ते 4:30

आज दुपारी 1 वा पर्यंत चांगला दिवस आहे.” सूर्याचा कन्या राशीत प्रवेश.
आज जन्मलेल्या बाळाची रास मिथुन असून वरीया योग, विष्टि करण शांती करून घेणे.

16 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

 तुमच्यावर बुध आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्या स्वभाव विनोदी असून उदार मनाचे असतात. प्रकृतीची सतत कुरकुर चालू असते. वैवाहिक जीवनात काहीतरी न्यूनता जाणवते. वरून शांत दिसला तरी मनात अस्वस्थ असतात. त्यामुळे रागीटपणा वाढतो. इतरांची ढवळाढवळ तुम्हाला सहन होत नाही .तुम्ही नम्र विनयशील असून स्वतःच्या अधिकाराचा बडेजाव करत नाही. वागण्यात सावधगिरी बाळगता तुम्हाला विश्रांतीची जरुरी असते. कामात अभ्यासुवृत्ती व पद्धतशीरपणा असतो. बुद्धिजीवी आयुष्य आवडते. कष्टाचे कामे होत नाहीत. रहस्यकथा व विनोदी चित्रपट याकडे ओढा असतो. दुसऱ्याच्या सुखदुःखाचा तुम्हीसहानुभूती ने  विचार करता. आतल्या आवाजाची देणगी असून बारीक गोष्टी सुद्धा लक्षात येते. चांगली व यशस्वी मुले होण्यात तुम्ही नशीबवान असता .

तुम्ही मनातून कायम अस्वस्थ असतात. एकाच वेळी तुम्ही सामर्थ्य आणि कमकुवतपणा या दोन्ही गोष्टींचा अनुभव घेतात. तुमचे ध्येय आणि महत्त्वाकांक्षा उच्च प्रतीचे असतात. परंपरागत रुढीन बद्दल तुम्हाला तिरस्कार असतो. मैदानी खेळ आणि प्रवास यांची आवड असते. स्वतःचे विचार इतरांना समजून सांगणे तुम्हाला आवडते. तुम्ही चटपटीत असून तुम्हाला आळशी पण आवडत नाही. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आणि विचार तर्कशुद्ध असतात. तुमचा दूर देशाशी किंवा परदेशाशी संबंध येतो. तुम्ही सर्वसाधारण लोकांमध्ये सहजासहजी मिसळत नाहीत. आवडत्या पुस्तकात तुम्ही तासान तास डोकं घालून बसतात. स्वतःचे ज्ञान आणि अधिकार यांची तुम्हाला पूर्ण जाणीव आहे. तुमची वृत्ती साशंक असते आणि खात्री झाल्याशिवाय तुम्ही कोणावर विश्वास ठेवत नाहीत. तुमचा दृष्टिकोन विशाल असून जीवनाकडे तुम्ही संयमाने बघतात. तुमच्यामध्ये धूर्त व्यापार वृत्ती असते. तुम्ही तुमचा अहंकार जोपासतात. मनाने तुम्ही मोकळे असून कृतीत मुक्तपणा असावा असे तुम्हाला वाटते. तुम्ही अस्वस्थता निर्माण करणाऱ्या भावनांना आवर घातला पाहिजे कारण तुमच्याकडून इतरांना स्फूर्ती मिळते.
पतीने सदैव तुमच्याकडेच लक्ष द्यावे अशी तुमची अपेक्षा असते .रूढी परंपरांना चिकटून राहणे तुम्हाला आवडत नाही. आवडत्या मैत्रिणींना जेवायला बोलवणे ,मेजवानी देणे, आलेल्यांच आदरातिथ्य करणे तुम्हाला आवडते .तुम्ही हुशार असून काही वेळा तुमचे वागणे मात्र अनाकलनीय असते. अतिशय अस्वस्थ असून लहान लहान गोष्टींवरून चिडता. लोकप्रियतेमुळे घरी येणारे जाणारे बरेच असतात ..वैवाहिक जीवनातल्या अडीअडचणींना शांतपणे तोंड देऊ शकता.

शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार.

शुभ रंग:- पिवळा आणि हिरवा.

शुभ रत्न:- पुष्कराज, पाचू, मोती आणि लसण्या.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

आजचे राशिभविष्य

मेष:- मैत्रिणींनो आज छोटे प्रवास घडतील.लेखन होईल.पराक्रम गाजवाल. आवडते छंद जोपासाल.प्रेमात यश.

वृषभ:-मैत्रिणींनो आज . कौटुंबिक सोहळ्यात नातेवाईकांशी भेटी होतील.घरात साफसफाई अभियान राबवाल. हरवलेली वस्तू सापडेल.

मिथुन:- मैत्रिणींनो आज मन आनंदी राहील.प्रवास घडेल.लाभ होतील.नवीन खरेदी होईल.शैक्षणिक यश मिळेल.

कर्क:- मैत्रिणींनो आज व्ययस्थानी चंद्र आहे. कलाकारांना यश.दानधर्म कराल.सुग्रास भोजनाचा आस्वाद घ्याल.कर्ज फिटेल.

सिंह:- मैत्रिणींनो आज लाभ स्थानी चन्द्र आहे. आर्थिक लाभ होतील. पतीची मर्जी राहील. प्रेमात यश.मैत्र परिवारासोबत छान गप्पा रंगतील.

कन्या:-मैत्रिणींनो आज तुमच्या राशीत प्रवेश करणारा रवी आत्मविश्वास वाढवेल.चांगली बातमी समजेल. मन आनंदी राहील. नोकरीत वरीष्ठ खूष असतील.कामानिमित्त प्रवास घडेल.

तुळ:-मैत्रिणींनो आज छान दिवस. धार्मिक यात्रा घडतील. भाग्य उजळेल.आवडत्या वस्तूची खरेदी होईल.

वृश्चिक:- मैत्रिणींनो आज अष्टमात चन्द्र आहे.मनशांती साठी धार्मिक कार्य कराल.कामात महिलांचे सहकार्य मिळेल.जेष्ठ व्यक्ती साठी खर्च होईल.

धनु:- मैत्रिणींनो आज पतीची साथ मिळेल.प्रतिस्पर्धी नामोहरम होतील.कनिष्ठ सहकार्य करतील.

मकर:-मैत्रिणींनो आज परदेशी जाण्याची इच्छा पूर्ण होतील. उत्साह वाढेल.नोकरी त बदल करू इच्छुकांना यश.सासरचे नात्यातून लाभ होतील.

कुंभ:- मैत्रिणींनो आज पंचमात चंद्र आहे. ज्ञानोपासना कराल. शेअर्स मध्ये लाभ.विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. मुलांच्या कडून आनंदाची बातमी मिळेल.

मीन:- मैत्रिणींनो आज चतुर्थ स्थानी चंद्र आहे. प्रवास घडतील. वास्तू विषयक प्रश्न मार्गी लागतील. घरगुती कामात मग्न रहा

RELATED ARTICLES

Most Popular