लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक11/4/2026 शिवसेना शिंदे गट लोकसभा संपर्क प्रमुख लातूर .कुर्ला मुंबई येथील आमदार श्री मंगेश कुडाळकर यांची शिवसेना प्रमुख श्री एकनाथ शिंदे डॉ श्रीकांत शिंदे पक्ष्यांनी नियुक्ती केली त्या पक्षाच्या आदेशानुसार आज लातूर दौऱ्यावर प्रथमच आले आहेत.. आमदार श्री मंगेश कुडाळकर हे बुथ पासून ते आमदार पदाचा प्रवास केवळ आपल्या कार्यातून साध्य केला आहे. म्हणुन राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी लातूर जिल्ह्याची जबाबदारी दिली. लातूर जिल्हा हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो. परंतु शिवसेना चा पण मतदार लातूर जिल्ह्यात आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती केलेले कोणी काँग्रेस ला मॅनेज झाले तर कधी भाजपला मॅनेज झाले म्हणून शिवसेनेचे वर्चस्व येथे दाखवता आले नाही. परंतु आता पर्यंत जे पक्ष्याचे संपर्क प्रमुख म्हणून लातूर जिल्ह्यात आले परंतु त्यांना सुध्दा पक्ष वाढविण्यासाठी यश आले नाही.आता भारतीय जनता पक्षाची लातूर मधील गटबाजी चव्हाट्यावर आली असून त्याचा फायदा शिवसेनाला होणार आहे.कारण शिवसेना मध्ये सुद्धा गट बाजी झाली असे दिसून येते. आमदार श्री मंगेश कुडाळकर यांचा अनुभव सामान्य कार्यकर्ता ते आमदार असा प्रवास झाल्या मुळे याचा फायदा लातूर लोकसभा मतदारसंघासाठी होणार यात शंका नाही . कार्यकर्त्यांना या लातूर लोकसभा संपर्क प्रमुख यांच्या कडून न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.. लातूर येथे दोन वाजता कार्यकर्ता बैठक. दुपारी चार वाजता अहमदपूर येथे कार्यकर्ता बैठक आयोजित केली आहे. उद्या सकाळी 10.30 आमदार श्री सुधाकर भालेराव यांच्या बंगल्या शेजारी मैदानावर कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.