दयानंद आडे,कासराळकर उदगीर , उदगीर व जळकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंत्री संजय जी बनसोडे साहेब जे तुम्ही स्वतःला विकास पुरुष म्हणून घेता.., कार्यसम्राट आमदार म्हणून घेता, अशा कार्यसम्राट विकास पुरुषाला मला विचारायचं !… आहे……………….. साहेब तुम्ही या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून काय विकास केलात.?….. साहेब उदगीर व जळकोट तालुक्यातील शेतकरी देशो- धडीला लागला आहे गेले दोन-तीन वर्ष झाली येथील शेतकऱ्याला पिक विमा नाही ,25% अग्रीम रक्कम नाही ,अनुदान नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही, सोयाबीनला हमीभाव नाही, माझ्या शेतकऱ्याला या निसर्गाच्या लहरीपणामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे .उदगीर व जळकोट तालुक्यातील शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे तरी बनसोडे साहेब तुम्हाला माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर जायला वेळ नाही मग तुम्ही नेमका विकास कुणाचा केला…?…….. बनसोडे साहेब एवढेच नव्हे उदगीर व जळकोट तालुक्यामध्ये माझा बंजारा समाजा खूप मोठ्या प्रमाणात राहतो माझा हा बंजारा समाज वाडी तांड्यावर राहणारा समाज आहे .गेल्या विधान सभेला हाच माझा बंजारा समाज तुम्हाला विधानसभेत पाठवण्यासाठी या माझ्या बंजारा समाजाचा खूप मोलाचा वाटा राहिलेला आहे. तुम्हाला ते मान्यच करावे लागेल……… बनसोडे साहेब उदगीर व जळकोट तालुक्यातील माझ्या बंजारा समाजाची खूप दैनिय अवस्था आहे .तुम्ही स्वतःला विकास पुरुष म्हणून घेता तुम्हीच सांगा कोणत्या तांड्याचा तुम्ही विकास केला ?… कोणत्या तांड्याचा तुम्ही पाण्याचा प्रश्न सोडवला ? कोणत्या तांड्याला तुम्ही जाण्यासाठी रस्ता करून दिला ? कोणत्या तांड्याला तुम्ही मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या .? कोणत्या तांड्याला आरोग्याच्या सुविधा पुरवल्या ,कोणत्या तांड्याला लाईटची व्यवस्था केली…….. अरे अशा लोकप्रतिनिधीला लाज वाटली पाहिजे की स्वतःला विकास पुरुष म्हणून घेतात….. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 ते 75 वर्षे झाली तरी माझ्या उदगीर तालुक्यातील रामघाट तांड्याला अजून पर्यंत जायला रस्ता नाही ,माझ्या मारुती तांड्याला रस्ता नाही ,माझ्या चोंडी तांड्याला रस्ता नाही ,जळकोट तालुक्यातील माझ्या डोंगरेवाडी तांड्याला अजून पर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही ,मग यांनी कोणता व कोणाचा विकास केला..? त्यांनी विकास केला साहेब गुत्तेदारांचा, त्यांनी विकास केला त्यांच्यासोबत फिरणाऱ्या चार नेत्यांचा, त्यांच्या कार्यकर्त्यांचा……….. बनसोडे साहेब रोडवरच्या चार-पाच बिल्डिंग बांधल्याने मतदारसंघाचा विकास होत नसतो साहेब माझ्या शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे गोरगरिबांचा विकास झाला पाहिजे शेतमजुरांचा विकास झाला पाहिजे कष्टकऱ्यांचा विकास झाला पाहिजे मजुरांचा विकास झाला पाहिजे….. आज मतदारसंघातील शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे साहेब तुम्हाला कोणाशीही काहीही देणे घेणे नाही .,तुम्हाला फक्त आणि फक्त गुत्तेदारांचा विकास करायचा आहे तुम्हाला तुमच्या अंधे कॉन्ट्रॅक्टरचा विकास करायचा आहे … साहेब येणाऱ्या काळामध्ये उदगीर व जळकोट मतदार संघातील सुज्ञ जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद………
